Sharad Pawar On Mahayuti Govt | ‘सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’, शरद पवारांचे आवाहन; म्हणाले – ‘भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही’
सातारा : Sharad Pawar On Mahayuti Govt | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील (Koregaon Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर रस्त्यावरील भंडारी मैदानावर (दि.१६) शरद पवार यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी महायुती वर निशाणा साधला.
“राज्यातील महायुती सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण देशाला जगविणारा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सरकारला या गोष्टी थांबवता येत नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती राज्य सरकार द्यायचे आहे. कोरेगावातील शशिकांत शिंदे यांच्यासारखी कर्तृत्त्ववान माणसं या निवडणुकीत विजयी करावीत”, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले, ” राज्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही,
त्यांनी सर्वसामान्य जनतेला विशेष करून महिलांना संरक्षण दिले नाही. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे.
संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग शेतमालाला योग्य किंमत मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे,
हे महाराष्ट्राचे चित्र आता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या सरकारला बदलायचे असेल तर कर्तृत्ववान माणसांच्या हाती राज्य देणे गरजेचे आहे”,
असे शरद पवार यांनी म्हंटले आहे. (Sharad Pawar On Mahayuti Govt)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’