Sharad Pawar On Manoj Jarange Patil | ‘मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला’, मनोज जरांगेंच्या निर्णयावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘उमेदवार दिले असते तर…’

Sharad-Pawar-Manoj-Jarange-Patil

मुंबई: Sharad Pawar On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून (Maharashtra Assembly Election 2024) माघार घेण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि.३) कोण- कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. तसेच, कोणत्या जागेवरील उमेदवार पाडायचे याबाबतही सांगितले होते.

“मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा”, असे आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली.

त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ” तिसऱ्या आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. उमेदवार दिले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed