Sharad Pawar On OBC-Maratha Reservation | ‘मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अन्…’; आरक्षणावर शरद पवारांची भूमिका; म्हणाले – “आम्ही सहकार्य करण्यास तयार पण..”
पुणे : Sharad Pawar On OBC-Maratha Reservation | राज्यात मागील काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेत्यांना बोलवावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. ते आज सोमवार (दि.१२) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “आज महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय राहील, हे सांगता येणार नाही. मी पर्याय सुचवला, माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली.
आता तुमच्या मार्फत असे सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील. मुख्यमंत्री याबाबतची बैठक बोलवतील, त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना बोलवावे.
त्याशिवाय, हा प्रश्न मांडण्याच्या बाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावे.
दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा, त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील,
त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावे. त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करुन यामधून मार्ग काढण्याची भूमिका घेऊ. (Sharad Pawar On OBC-Maratha Reservation)
५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही,
असे निकालही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भूमिका केंद्र सरकारने घ्यावी.
त्याला कोणताही विरोध न करता आम्ही पाठिंबा देऊ.
या पद्धतीने मार्ग काढू आणि आपण आरक्षण मिळवू” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु