Sharad Pawar On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले – “ती साधीसुधी माणसं नाही”

Sharad Pawar-Narendra Modi

पुणे: Sharad Pawar On PM Narendra Modi | विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections 2024) तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. यामध्ये १० पैकी ८ खासदार निवडून आले. त्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटात मोठी इन्कमिंग झाली आहे. सध्या शरद पवारांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. (Sharad Pawar On PM Narendra Modi)

https://www.instagram.com/p/DAdi_yDpRi9

दरम्यान पुण्यातील सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारसभेत बोलत असताना काँग्रेस पक्षावर आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर पवारांनी मोदींना चांगलेच सुनावले आहे.

https://www.instagram.com/p/DAdg3Dwi_lf

शरद पवार म्हणाले, ” मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचे योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी १४ वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधी यांनी या देशासाठी काय केलं नाही? तरी त्यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधींनी आधुनिकतेचा विचार देशासमोर मांडला. त्यांची हत्या झाली. या एका घरानं किती त्याग करायचा?

https://www.instagram.com/p/DAdfBi5imA1

आजच्या काळात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या लोकांचं देशाच्या स्वातंत्र्यात योगदान नाही का? ज्या कुटुंबातील तीन-तीन पिढ्या देशाच्या हितासाठी काम करतात, अशा लोकांवर मोदी टीका करतात. खरं तर त्यांना वाटलं पाहिजे की ही सर्व साधीसुधी माणसं नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केलं?”, असे पवारांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAddM0mi6ri

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)