Sharad Pawar On Rashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘आता त्या…’

Sharad Pawar - Rashmi Shukla

मुंबई: Sharad Pawar On Rashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले असून पोलीस महासंचालक पदी विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत,असाही आरोप पटोलेंकडून करण्यात आला होता.

दरम्यान, याप्रकरणावर आता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ” निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांचा कालखंड संपलेला आहे.
त्याबद्दल अनेक लोक जाहीरपणे बोलतात. त्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कालखंडात
अनेक निर्णय घेण्यात आले. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed