Sharad Pawar On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या प्रश्नावरून शरद पवार संतप्त; म्हणाले – “भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का?, दर्जा फार…”
पुणे: Sharad Pawar On Sambhaji Bhide | राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण चांगलंच तापलं आहे. ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून (Maratha Andolan) नेत्यांच्या गाड्या अडवत त्यांना जाब विचारला जात आहे. अशातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना मराठ्यांनी आरक्षणाचा आग्रह धरू नये, असे म्हंटले होते. (Sharad Pawar On Sambhaji Bhide)
“मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. आमच्या सांगवी गावात कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे. त्यात वाघ-सिंहांनी प्रवेश मागावा का? एखाद्या ग्लायडिंग सेंटर मध्ये गरुडानं प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये माशानं प्रवेश मागावा का? मराठ्यांनी आरक्षण मागावं का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे.
आरक्षण कुठलं काढलंय? मराठा जात सबंध देशाचा संसार चालवणारी आहे. हे ज्या दिवशी मराठ्यांच्या लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून निघेल. हे त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवं आहे”, अशी भूमिका भिडे यांनी मांडली होती.
आज शरद पवार यांची पत्रकार परिषद पुण्यात सुरु असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना संभाजी भिडेंच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. संभाजी भिडेंबाबत प्रश्न सुरू होताच तो पूर्ण व्हायच्या आत शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करताना प्रतिक्रिया देणार नसल्याचे नमूद केले.
” संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का?
काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक..”, असे म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतल्याचे पाहायला मिळाले.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य