Sharad Pawar On Vidhan Parishad Election | विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार महायुतीला दणका देणार? म्हणाले – ‘अजित पवारांचे नेते…’
सातारा : Sharad Pawar On Vidhan Parishad Election | लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. या यशानंतर शरद पवार गटात इन्कमिंग सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांनी काही वेळापूर्वी सातारा (Satara News) येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांना विचारण्यात आले की अजित पवार गटाचे नेते तुमच्या संपर्कात आहेत का? त्यावर पवार म्हणाले, माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची मला माहिती आहे. याचे परिणाम विधानपरिषद निवडणुकीत पाहायला मिळतील. (Sharad Pawar On Vidhan Parishad Election)
दरम्यान, शरद पवार यांना विचारण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते १०० पार बद्दलही बोलत नाहीत, हे कशामुळे शक्य झालं? महाविकास आघाडीची महायुतीला धास्ती आहे का? यावर शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वत्र ४०० पारचा नारा देत होते. ते कुठेही ४०० पेक्षा कमी काही बोलतच नव्हते. ते अनेक गोष्टी सांगत होते. परंतु, देशाच्या पंतप्रधानांनी एखादी भूमिका लोकांसमोर मांडताना ती भूमिका राष्ट्रहिताची आहे का याचं भान ठेवायला हवं.
ते पुढे म्हणाले, ” शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते ज्या पद्धतीची भाषणं करत होते,
त्यामुळे जातीय आणि धार्मिक कट्टरतावादी शक्ती उफाळून आल्या, समाजाचे नुकसान झाले,
देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हेच त्यांचं निवडणुकीचे सूत्र होते.
याच पद्धतीने त्यांना निवडणुका लढायच्या व जिंकायच्या होत्या.
मात्र देशातला सामान्य माणूस हा राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणा झाला आहे.
त्यामुळेच त्यांनी संविधान वाचवण्याचा निर्णय घेतला.
काही लोक अतिरेकी वृत्तीने निवडणूक काळात लोकांसमोर गेले.
लोकांना चुकीच्या मार्गाने नेत होते. मात्र मतदारांनी त्यांचा डाव हाणून पाडला.
उद्याच्या निवडणुकीत यासंदर्भात राज्यात जे काही करण्याची गरज असेल ते
इथले मतदार नक्कीच करताना दिसतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?