Sharad Pawar Sabha In Pimpri Chinchwad | अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा; 20 जुलैला मोठा धक्का

sharad-pawar-ajit-pawar

चिंचवड : Sharad Pawar Sabha In Pimpri Chinchwad | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. काही आमदार सोबत घेऊन महायुतीत सहभागी होत त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. महायुतीत सहभागी झाल्यावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवार गटाला मोठे यश मिळाले.

शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आले. तर अजित पवार गटाचा केवळ एक खासदार निवडून आला. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र ही जागा अजित पवार निवडून आणू शकले नाहीत. आता लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे.

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना एका मागून एक धक्का बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या सोबत असलेले अनेकजण शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत. काहींनी शरद पवार गटात प्रवेशही केलेला आहे. दरम्यान आता २० जुलै ला शरद पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा होणार आहे.

दरम्यान यावेळी शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. जुने आणि नवीन कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि जेष्ठ नेते शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनी अजित पवार यांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

चिंचवड आणि भोसरीला भाजप आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीमधील अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती,
त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती.
आता याच दारातून नाना काटे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरात शरद पवारांची सभा होत आहे.
या सभेनंतर आणखी चित्र बदलू शकते असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान