Sharad Pawar Saswad Sabha | ‘गद्दारीचा शिक्का नको असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही’, शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – “आमचं चुकलं असं जाहीर करा अन्…”

पुणे: Sharad Pawar Saswad Sabha | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान सासवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार (MVA Candidate) आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap MLA) यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले, ” काहीजण पाच वर्षे मुंबईत राहतात, निवडणुका आल्या की गावाला येतात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत असे सांगून लोकांना भुलावायचे. मुख्यमंत्रीही येतात, कौतुक करतात आणि निघून जातात. याला काय अर्थ आहे. (Sharad Pawar On Vijay Shivtare)
गुंजवणी प्रकल्प (Gunjavani Dam) आम्ही मंजूर केला. ९५ टक्के काम ही पूर्ण केले. पुढे ते दहा वर्षे सत्तेत होते. त्या विभागाचे मंत्री होते. मात्र अजूनही पाणी आले नाही. पुरंदरच्या इतर योजना पुरंदर उपसा जलसिंचन, जानाई शिरसाई योजना, उद्योगवाढीसाठी यांचे योगदान काय?” अशी टीका शरद पवार यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता केली.
आमचेच एक सहकारी माजी जिल्हाधिकारी निवडणुकीत उतरले आहेत. प्रेक्षकांकडे पाहत शरद पवार यांनी विचारले त्याला आजच्या भाषेत काय म्हणतात, प्रेक्षकांकडून एकच आवाज आला. “गद्दार”.
यानंतर पुन्हा भाषण सुरू करताना पवार पुढे म्हणाले, ” त्यांनी प्रशासकीय काम केले. आम्हाला अभिमान आहे. निवृत्त झाल्यानंतर आपण आमच्याबरोबर आलात. आम्हाला आनंद झाला. समाजात काम करण्यासाठी संधी मागितली. आम्ही ती ही दिली. मात्र विधानसभेला उमेदवारी मागितली.
मात्र पुरंदर-हवेलीचा अंदाज घेतला असता गेली पाच वर्षे लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संजय जगताप
यांनाच निवडणुकीत निवडून यायची संधी असल्याचे दिसून आले.
आघाडी धर्मानुसार त्यांनाच उमेदवारी देणे हे ही क्रमपात्र होते.
शहाण्याने हे समजून घ्यायचे असते. गद्दारीचा शिक्का नको असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
आमचं चुकलं असं जाहीर करा, थांबा आणि संजय जगताप यांना पाठिंबा द्या. सन्मान मिळेल,
अन्यथा तुमचे तुम्हीच ठरवा. पुरंदरची जनता अंजिरापेक्षाही गोड आहे, अन्यथा खूप खवट ही आहे”,
अशा शब्दात शरद पवार यांनी संभाजी झेंडे (Sambhaji Zende) यांचे नाव न घेता अल्टिमेटम दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध