Sharad Pawar Slams Devendra Fadnavis On Vote Jihad | ‘व्होट जिहाद’ वरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले,” पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपालाच मतदान करतात”

sharad pawar-devendra fadnavis

मुंबई: Sharad Pawar Slams Devendra Fadnavis On Vote Jihad | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून प्रचारादरम्यान व्होट जिहादचा मुद्दा मांडला जात आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओचा दाखला देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबाबत माध्यमांनी शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी फडणवीसांवरच निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले, ” व्होट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केले तर तो त्यांचा अधिकार आहे.

पुण्यामध्ये काही मतदारसंघात एक विशिष्ट समाज भाजपाला मतदान करतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे. कारण ते नेहमीच तसे मतदान करतात. याचा अर्थ तो काही जिहाद होत नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन त्यांची विचारधारा दिसते”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, ” व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकप्रकारे
या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत.
बटेंगे तो कटेंगे हा विषयदेखील धार्मिक मुद्द्यावरचा आहे.

सत्ताधारी जेव्हा हे विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही,
अशी खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळेच धार्मिक विषय काढून निवडणूक इतर विषयांवर नेण्याचा प्रयत्न होत आहे”,
असे शरद पवार यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed