Sharad Pawar Vs Ajit Pawar | जनसन्मान यात्रेनंतर शरद पवार गटाची बारामतीत “स्वाभिमान यात्रा’; अजित पवारांना आव्हान

sharad pawar vs ajit pawar

बारामती : Sharad Pawar Vs Ajit Pawar | लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभा (Baramati Assembly) आता चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील जनसन्मान यात्रेनंतर (Jan Sanman Yatra) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने ‘स्वाभिमान यात्रा’ काढण्यात येणार आहे. मंगळवार (दि.१०) पासून या यात्रेची सुरुवात होत आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

युगेंद्र पवार म्हणाले, ” पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. यामध्ये जनतेशी मुक्त संवाद करणार आहे.

साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल’ या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढविण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी बारामतीकरांना भेटणार आहे.

तसेच यावेळी लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
बारामतीकरांनी या यात्रेमध्ये अवश्य सहभागी व्हावे. यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानी विचारांचा चौफेर जागर करुया, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed