Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा! (Video)

Bhimashankar Sugar Factory

भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

पुणे : Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या (Bhimashankar Sugar Factory) वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा भिडले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तब्बल दोन तासांच्या गदारोळानंतर सभा सुरू झाली.

https://www.instagram.com/p/C_k79a4JX9J

भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) तसेच त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम (Nikam Devdatta) या दोघांचे समर्थक उपस्थित होते.

शरद पवार गटाचे समर्थक निकम यांनी आरोप केला की, “आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड आणण्यात आले.”

या मुद्द्यांवरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. खुर्च्या नाचवत हिणवत होते. यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा होतच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली.

राजकीय रंग देऊन स्वत:ची पोळी भाजण्याचे प्रयत्न
दरम्यान अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पलटवार करत म्हटले की,
” विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केले आहेत.
देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं.
उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले.” (Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed