Shaurya Din Vijaystambha | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 6000 पोलिसांचा बंदोबस्त; SRPF च्या 12 तुकड्या, पार्किंगची मोठी व्यवस्था, CCTV, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर
पुणे : Shaurya Din Vijaystambha | पेरणे फाटा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणार्या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस दलाने ६ हजार पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला असून सर्व परिसरात १६५ सीसीटीव्ही, ६ ड्रोन कॅमेर्यांद्वारे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून १ पोलीस अधीक्षक, ७ अपर पोलीस अधीक्षक, २३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३०६ पोलीस अधिकारी, ३ हजार ८० पोलीस अंमलदार, १५०० होमागार्ड, १२ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या व ७ बॉम्ब शोधक व नायक पथके तैनात करण्यात येणार आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून १६५ सीसीटीव्ही कॅमेरे, ६ ड्रोन कॅमेरे व पी ए सिस्टीम ची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून सर्वांकरीता पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विद्युत पुरवठा, फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिवादनाकरीता येणार्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pankaj Deshmukh IPS) यांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून बंदोबस्ताच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले आहे.
पार्किंग व्यवस्था
नगर रोडकडून येणारे अनुयायी यांच्यासाठी वक्फ बोर्ड तसेच टोरंट गॅस पार्किंग, जातेगाव चाकण रोड या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पार्किंग ठिकाणाहून डिंग्रजवाडी फाट्यापर्यंत पीएमपी बस गाड्यांच्या माध्यमातून अनुयांयांना ने आण करण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.
भीम नदीवरील पुल ओलांडुन अनुयायी अभिवादन करण्याकरीता जयस्तंभापर्यंत जाऊ शकतात.
नव वर्ष स्वागत
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात.
त्या अनुषंगाने पोलीस दलाकडून खबरदारीची उपाय योजना करण्यात आलेली आहे.
धार्मिक स्थळ तसेच गडकिल्ल्यांवर कोणीही मद्यप्राशन करु नये.
तसेच दारू पिऊन वाहन चालविणार्या वाहन चालकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत