Shikhar Bank Scam | अजित पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ ला नव्यानं आव्हान; शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी 7 कारखान्यांची कोर्टात धाव

Ajit Pawar

मुंबई : Shikhar Bank Scam | कथित शिखर बँक घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा अजित पवार यांच्याशी संबंधित तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Mumbai EoW) विशेष न्यायालयात काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता.

त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मानला जात होता. मात्र आता याप्रकरणी राज्यातील सात कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्याने पवार यांची पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निषेध याचिका दाखल करणाऱ्या कारखान्यांमध्ये जरंडेश्वर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील, जय अंबिका, जालना, पारनेर या कारखान्यांचा समावेश आहे.

विविध कारखान्यांनी दाखल केलेल्या निषेध याचिकांवर शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. यु कदम यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कथित घोटाळ्यातील पीडित लोक निषेध याचिका करू शकतात का? असा प्रश्न न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला विचारला होता. याबाबत आता गुणवत्तेवर युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी न्यायालयात २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो किंवा गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो, तेव्हा पोलीस ‘सी’ समरी रिपोर्ट दाखल करतात. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी २० जानेवारी रोजी पोलिसांनी ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला होता. नव्याने तपास करूनही काहीही पुरावे हाती लागले नाही, असे पोलिसांनी म्हटले होते.

सप्टेंबर २०२० मध्ये पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला होता.
परंतु, ऑक्टोबर २०२२ मध्ये ईओडब्ल्यूने नव्याने तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली.
त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली.
त्यानंतर ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार,
रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed