Shikhar Bank Scam Case | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ; शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी चिंता वाढली
मुंबई : Shikhar Bank Scam Case | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यावर अजित पवारांवर झालेले वेगवेगळे घोटाळ्याचे आरोप काही काळ थांबल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता पुन्हा शिखर बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अजित पवारांच्या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२० मध्ये अजित पवार यांना ‘क्लीन चिट’ देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
यानंतर आता या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, त्याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ असराजी साबळे,
रामदास पाटीबा शिंगणे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत चार स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या आहेत.
ईओडब्ल्यूने सप्टेंबर २०२०मध्ये अजित पवार यांना ‘क्लीन चिट’ देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत.
त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनीही न्यायालयात धाव घेतली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक