Shikrapur Pune Crime News | पुणे: शिवसेना शिंदे गटाच्या दत्तात्रय गिलबिले यांची हत्या; शिक्रापूर येथील घटना
पुणे : Shikrapur Pune Crime News | जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले Dattatraya Bandu Gilbile (वय ५१) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. (Shikrapur Murder Case)
दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजताच शिक्रापूर व परिसरात एकच खळबळ उडाली. मालमत्ता अथवा इतर कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलीस पथक हल्लेखोरांच्या मागावर असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड (PI Diparatan Gaikwad) यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ पुणे येथे खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. (Shikrapur Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी