Shikrapur Pune Crime News | धक्कादायक! शिक्रापूर मध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; 13 वर्षीय मुलांकडून लैंगिक अत्याचार
आरोपीला शिक्रापूर पोलिसांकडून तात्काळ अटक
शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Shikrapur Pune Crime News | पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे , यामध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) येथे 13 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरुर येथील पिडीत तीन वर्षीय चिमुरडीची आई बाहेर गेलेली असताना घरात आलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाने चिमुरडी घरात एकटी खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला, दरम्यान चिमुरडीची आई घरात येताच हा युवक पळून जाऊ लागला, याबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौदा वर्षीय अल्पवयीन युवकावर बाल लैंगिक अत्याचार सह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे, त्याची रवानगी बालसुधारक गुहात करण्यात आली आहे, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले व पोलीस नाईक उमेश जायपत्रे करत आहे. (Shikrapur Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’