Shikrapur Pune Crime News | चुलत भावाने बोनेटवर पडलेल्या भावाला नेले फरफटत; केंदुरमधील घटनेत तरुण गंभीर जखमी (Video)

पुणे : Shikrapur Pune Crime News | शेजारी शेजारी असलेल्या भावांमध्ये जागेवरुन झालेल्या (Land Dispute) भांडणात चुलत भावाने मारुती इस्टींगाने भावाला धडक दिली. तेव्हा त्याने बोनेटला पकडले. तशा स्थितीत भावाला जवळपास तीनशे ते पाचशे मीटर फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
https://www.instagram.com/p/DB2-sUDJ5L8
याप्रकरणी राजेंद्र्र नाथु शिटे (वय ४६, रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनायक सदाशिव थिटे, वैशाली विनायक थिटे, गणेश सदाशिव थिटे, सारीका गणेश थिटे, अमित सदाशिव थिटे, कोमल अमित थिटे, सदाशिव बुधाजी थिटे, मधुरा गणेश थिटे, अथर्व विनायक थिटे (सर्व रा. थिटेआळी, केंदूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केंदूरमध्ये शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली.
यामध्ये राजेंद्र थिटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूरमधील साई अॅक्सिडेट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची केंदूर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. फिर्यादीच्या वाट्याला आलेल्या जमिनीमध्ये त्यांचे जुने घर होते. ८ ते ९ महिन्यापूर्वी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरु केले. त्यांनी वीजचे मीटर त्यांच्या वाटणीमधील जांभळाचे झाडाला लावले होते. त्याचा चुलत भाऊ विनायक थिटे याने त्या मीटरजवळ खेटून पत्रा ठोकून त्याचे मीटर दिसून नये, असा पत्रा लावला.
१ नोव्हेबर रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबियांसह नवीन बांधकाम पाहण्यासाठी गावी गेले. फिर्यादीच्या मीटरला खेटून पत्रा लावला असल्याने मीटर दुसरीकडे हलवायला ते गेले. त्यावेळी मीटरला लागून असलेला पत्र्याला त्यांचा धक्का लागला. म्हणून चुलत भाऊ विनायक व त्याचे घरातील सर्व जण आरडाओरडा करत फिर्यादीकडे धावत आले. त्यांनी ही जागा आमची आहे़ असे म्हणत तुम्ही पत्रा का हलवला, असे म्हणून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले.
तेव्हा त्यांची पत्नी अनिता राजेंद्र यांना वाचवायला मध्ये पडली असता तिलाही मारहाण केली.
तिची साडी निघाली. फिर्यादीचा मुलगा आकाश यालाही मारहाण केली. फिर्यादीची मुलगी प्रतिमा
हे सर्व मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग केले. ते पाहून विनायक थिटे
याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. सर्वांनी त्यांना दगडे फेकून मारली.
त्यावेळी विनायक थिटे हा त्याच्याकडील मारुती इस्टिगामध्ये बसून ती चालवत फिर्यादीच्या
पाठीमागे आणली. गाडी पाहून फिर्यादी पाठीमागे वळले, तेव्हा विनायकने त्यांच्या पोटाला धडक दिली.
त्यावेळी त्यांच्या पोटाला बरगड्यांना तसेच इतर ठिकाणी मुक्का मार लागला.
त्यांच्या उजव्या पायाचा घोटा फॅक्चर झाला. त्याने गाडीने ठोस दिल्यानंतर फिर्यादी गाडीचे बोनेटवर पडले. तेव्हा त्यांनी बोनेटला धरुन ठेवले. तरीही विनायक याने फिर्यादी बोनेटवर पडले असतानाही गाडी तशीच तीनशे ते पाचशे मीटर चालवित नेली. त्यानंतर फिर्यादी यांनी कसे तरी करुन आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार मळेकर तपास करीत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा