Shirur Pune Crime News | एस टी बसचालक, वाहकाला मारहाण ! डंपर बाजूला घे सांगितल्याने वादातून घडली घटना
पुणे : Shirur Pune Crime News | बस थांब्यावर एस टी बसच्या समोर उभा केलेला डंपर बाजूला घे, असे सांगितल्याच्या कारणावरुन डंपर चालकाने एस टी बसचालक व वाहकाला मारहाण केली. (Marhan)
याबाबत बसचालक कुंडलिक ज्ञानदेव गाडीलकर (रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल सोनवणे (रा. जांबुत, ता. शिरुर) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जांबुत गावातील पंचतळे येथील चौकात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबुत गावातील पंचतळे येथील चौकात एस टी बस थांब्यावर बस थांबली होती. त्यावेळी राहुल सोनवणे याने त्याचा डंपर बसच्या समोर उभा केला. फिर्यादी यांनी त्याला डंपर बाजूला घे, असे म्हणाले. त्यावर त्याने फिर्यादी व वाहक शांताराम मारुती रासकर यांना शिवीगाळ करुन दमदाटी करीत हाताने मारहाण केली. त्यांना ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा आणला. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे (PI Jotiram Gunjawate) तपास करीत आहेत. (Shirur Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण