Shirur Pune Crime News | बँक अधिकार्‍यांनीच संगनमत करुन फेड बँकेला घातला सव्वा कोटींना गंडा; बँक अधिकार्‍यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Shirur Pune Crime News | बँक अधिकार्‍यांनी कागदपत्रे पडताळणी करणारी कंपनी, फ्री लायन्सर, व्हल्युअर अशा सर्वांशी संगनमत करुन गावठाण प्रमाणपत्रे, कर पावतीची बनावट कागदपत्रे तयार करुन फेड बँकेला तब्बल १ कोटी २७ लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत फेड बँक फायनाशियल सर्व्हिसेस (Fed Bank Financial Services) या फायनान्स कंपनीचे अधिकारी दिगंबर संदीपान फुले (वय ३०, रा. गंगाकुज सोसायटी, कळस) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँकेचे अधिकारी प्रीतम घोलप, शत्रुंजय साटणकर, रुद्रा इन्टरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ, व्हल्युअर सागर लोढा, फ्री लानसर आदेश साळुंखे (रा. इनामगाव, ता. शिरुर), कर्जधारक व सह कर्जधारक उत्तम तुकाराम नांदरे, सुनिता उत्तम नांदरे, राहुल दत्तात्रय शिंदे, दत्तोबा विष्णु शिंदे, प्रकाश मोहन धारकर, अक्षय प्रकाश धारकर, रविंद्र तात्याबा शिंदे, कल्पना रवींद्र शिंदे, प्रशांत अनिल गरुड, योगिता प्रशांत गरुड, गौरव बाबासाहेब नंदखिळे, बाळासाहेब रामचंद्र नंदखिळे, प्रतिभा संतोष कोंडे, संतोष बाळासाहेब कोंडे, ऋषिकेश बाबुराव शिंदे, सपना ऋषिकेश शिंदे, अक्षय अशोक गरुड, शोभा अशोक गरुड, शिवाजी ज्ञानदेव कोंडे, मंगल शिवाजी कोंडे (सर्व रा. गणेगाव दुमाला, ता. शिरुर), अजित जालिंदर गवळी, अश्विनी अजित गवळी (रा. बाभूळसर, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा २३ नोव्हेबर २०२२ ते २२ मे २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेड बँक फायनान्सियल सर्व्हिसेस ही फायनान्स कंपनी ही फेडरल बँकेशी संलग्न आहे. ही फेड बँक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज देते. त्यासाठी वेगवेगळ्या योजना असून त्यांचे नेमलेले प्रतिनिधी प्रत्यक्ष लोकांना भेटून कर्ज योजनाची माहिती देतात. बँकेने डीएसए नेमण्यात आले असून ते कर्ज प्रकरणे बँकेमध्ये सादर करत असतात.

शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील लोकांना कर्ज देण्यात आले होते. त्या कर्जाचे हप्ते थकविण्यात आले होते. बॅकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन तपासणी केली. त्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्रे बनवून फेडबँकेची फसवणूक करण्यात आली असल्याचे निदर्शनात आले.

बँकेचे अधिकारी प्रीतम घोलप व शंत्रुजंय साटणकर यांनी रुद्रा इंटरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ, व्हल्युअर सागर लोढा, फ्री लानसर आदेश साळुंखे यांनी संगनमत करुन कर्जधारक व सहकर्जधारकांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. गणेगाव दुमाला या गावी असलेले दुग्ध व्यावसायिक यांना मालमत्ता गहाण ठेवून कर्ज हवे असल्याचे आदेश साळुंखे यांनी बँक अधिकार्‍यांना सांगितले. त्यानुसार कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची पडताळणी रुद्रा इंटरप्रायजेस यांनी केल्याचे भासवले. बँकेने नेमलेले वकील गिरीश लेले यांनी मुळ कागदपत्रेवरुन तपासणी करुन सर्च रिपोर्ट घेऊन त्यांचा अभिप्राय दिला. बँकेचे अधिकारी शत्रुंजय साटणकर यांनी जागेला भेट देऊन मालमत्तेची सत्यता पडताळणी केल्याचे भासवले व तसा अहवाल दिला.

सर्व कागदपत्रांची कायदेशीर बाबी तपासणी करुन अहवाल देण्यासाठी सागर लोढा यांना नेमण्यात आले.
त्यांनी अहवाल दिला. ज्या कारणासाठी कर्ज हवे त्याची सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर कर्ज देण्यात आले.
त्यानंतर त्यांच्याकडून हप्ते थकविण्यात आले. तेव्हा बँकेकडून आनंद नलावडे, दिगंबर फुले, मंगेश पोंडे,
नामदेव शिंदे यांच्या समितीने गावात जाऊन तपासणी केली. तेव्हा कर्ज प्रकरणासाठी देण्यात आलेल्या मालमत्ता
या त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. गणेगाव दुमाला ग्रामपंचायतीची कागदपत्रे तपासणी केली असता
त्यात नमुना ८ गावठाण प्रमाणपत्र व कर पावती ही बनावट असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी जो नमुना दाखल जोडण्यात आला तो त्यांच्या ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नसल्याचे ग्रामसेवकांनी सगितले.
हे सर्व पाहता बँक अधिकार्‍यांनी इतरांशी संगनमत करुन गाव नमुना ८, गावठाण प्रमाणपत्र व
कर पावती बनावट कागदपत्रे बनवून कर्ज प्रकरणासाठी बँकेला सादर केली.

बँकेच्या कर्मचार्‍यांनी जागेला भेट देताना त्याची खात्री न करता तसेच रुद्रा इंटरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ व
व्हल्युअर सागर लोढा यांनी सत्यता न तपासता खोटे व बनावट अहवाल सादर केले.
त्यामुळे कर्जदार व सह कर्जदार यांनी फेड बँकेकडून गैर मार्गाने १ कोटी २७ लाख ७१ हजार रुपये प्राप्त करुन फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. (Shirur Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन