Shirur Pune Crime News | पेट्रोल पंपावरील विक्रीची रक्कम घेऊन कामगार पसार !

पुणे : Shirur Pune Crime News | पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन कामगार गावी निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रभाकर गावडे (वय ६३, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे (रा. जळगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टाकळी हाजी येथे हिंदुस्थान पेट्रोलियमचा वॅकटेश पेट्रोलियम या नावाने पेट्रोल पंप आहे. तेथे महादेव कोकाटे हा कामगार ठेवला होता. त्याने १७ व १८ जून या दोन दिवसांतील पेट्रोल, डिझेल विक्री केली. दोन दिवसाची एकूण रक्कम ६ लाख २ हजार ४२७ रुपये जमा झाली होती. त्यापैकी ४ लाख ७० हजार ४१७ रुपये त्याने जमा केली.
उर्वरित रक्कम त्याने फोन पेवर घेतली होती. ती १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम जमा न करता तो गावाला निघून गेला. त्याचा फोन बंद लागत होता. त्याच्या वडिलांना फोन केल्यावर त्यांनी ६३ हजार ५०० रुपये आणून दिले. उर्वरित ८२ हजार १२२ रुपये १५ दिवसात जमा करतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी ते पैसे जमा करीत याची वाट पाहिली. त्यांना वारंवार फोन केल्यावर त्यांचा फोन लागत नव्हता. शेवटी त्यांनी पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार केली आहे. (Shirur Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा