Shirur Pune News | दादा शिवसेनेत पुन्हा परत या ! आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमची गरज आहे; कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना साद
पुणे : Shirur Pune News | शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur Lok Sabha) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन (Ajit Pawar NCP) तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. मात्र तरीही आढळराव पाटील यांनी परत शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Eknath Shinde) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची (Mahayuti) शिरुरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले. अमोल कोल्हे निवडून आले. त्यानंतर आता आढळराव पाटील यांनी पुन्हा शिंदे गटात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
दि.२ वाघोली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील (Ganesh Satav Patil) यांच्या कार्यालयात युवा शिवसैनिकांची बैठक झाली. बैठकीत सर्व शिवसैनिकांनी गणेश सातव पाटील यांच्याकडे एकच मागणी केली की, शिवाजीदादा आढळराव पाटील यांना विनंती करावी त्यांनी पुन्हा शिवसेनेत यावे.
या बैठकीनंतर सोशल मीडिया वरती आता पुण्याचे युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील
यांच्या नावाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो टाकून
‘लवकरच शिरूर लोकसभेत पुन्हा शिवाजी दादा रूपाने भगवे वादळ दिसणार, दादा आपण शिवसेनेत पुन्हा परत यावे ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा’ अशा स्वरूपाच्या असंख्य पोस्ट आता समाजमाध्यमात फिरू लागल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?