Shiv Sangram – Dr Jyoti Mete | आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पाच जागा लढवणार ! पुण्यातील शिवसंग्राम कार्यकारणी बैठकीत डॉ. ज्योती मेटे यांचे प्रतिपादन

Shiv Sangram - Dr Jyoti Mete

सर्वानुमते डॉ. ज्योती मेटे यांची अध्यक्षपदी फेर निवड; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम मध्ये खांदेपालट

पुणे : Shiv Sangram – Dr Jyoti Mete | दिवंगत विनायकराव मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे दी.१८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यावेळी कार्यकारणीचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे पुढील पाच वर्षासाठी कार्यकारिणी निवड करण्यात आली आणि डॉ. ज्योती मेटे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मेटे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पाच जागा लढवणार असल्याचे सुतोवाच केले. (Maharashtra Assembly Election 2024)

पुणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे संपन्न झालेल्या या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांची फेरनिवड करण्यात आली त्याचबरोबर प्रदेशउपाध्यक्ष पदी शिवसंग्राम चे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे आणि छत्रपती संभाजीनगरचे सलीम पटेल यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी नांदेडचे नितीन लाठकर, खजिनदारपदी मुंबईचे राम जगदाळे, चिटणीस पदी भंडाऱ्याचे प्रा. डी.एस.कडव , मुंबईचे योगेश विचारे आणि सदस्यपदी हिंदुराव जाधव, भरत लगड, बालाजी जाधव, सुंदर मस्के यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतील व तहहायात पाठपुरावा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे २४ डिसेंबर २०१६ रोजी जलपूजन होऊन देखील काम पूर्णत्वास गेले नसल्याने याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा त्याचबरोबर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यात यावे असा ठराव संमत करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ. ज्योती मेटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात संघटनेचे पुनर्बांधणी करावी तसेच येणाऱ्या विधानसभा महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इत्यादी निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी करावी शिवसंग्राम सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असून विधानसभेच्या पाच जागा देखील लढणार आहे त्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024 | ‘आता बँकेला ३०० कोटी …’, अजित पवार गटातील आमदाराचे मोठे विधान; म्हणाले – ” नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो…”

Mahayuti Seat Sharing | जागावाटपाची चर्चा रखडल्याने अजित पवार गटात अस्वस्थता; शिंदे गटाइतक्याच जागा मिळण्याची अपेक्षा

You may have missed