Shiv Sanman Yatra | शिवसन्मान यात्रेच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाला धक्का? जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट
जुन्नर : Shiv Sanman Yatra | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी म्हणून राष्ट्रवादीने शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) वतीने आजपासून शिवजन्मभूमी शिवनेरी (Shivneri Fort) येथून शिवसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी महायुतीला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील (Junnar Assembly Constituency) माजी आमदार शरद सोनवणे (Former MLA Sharad Sonavane) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली. तसेच सोबत जेवण करत चर्चाही केल्याचे पाहायला मिळाले.
तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीतही (Mahayuti) अंतर्गत संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. जागावाटपात विद्यमान आमदारांना प्राधान्य दिले जाणार असल्याने इतर इच्छुकांकडून दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Banke) यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जुन्नरच्या माजी आमदारानेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
या भेटीवर शरद सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले, “आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मी गेलो होतो.
राज्यातील एखादा मोठा नेता जुन्नरमध्ये आल्यानंतर माजी आमदार या नात्याने मी त्यांची भेट घेत असतो.
जयंत पाटील यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सोबत भोजन करण्याची विनंती केली.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असा दावा सोनवणे यांनी केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन