Shivaji Nagar Assembly Election 2024 | भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यकर्त्यात हाणामारी

पुणे : Shivaji Nagar Assembly Election 2024 | शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या कार्यकर्त्यांमध्येच गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. संगमवाडीमध्ये हा प्रकार घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी गावठाणात गुरुवारी रात्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. संगमवाडी गावातून रॅली झाल्यानंतर शिरोळे हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरु झाली. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यातून एकाच पक्षातील, एकाच गावातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. या वादाची माहिती येरवडा पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी आणि अंमलदार तातडीने संगमवाडी गावठाणात पोहचले. त्यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. संबंधित लोकांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास येण्यास सांगितले.
दरम्यान, या कार्यकर्त्यांमध्ये आपसात बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या काळात पोलीस तक्रार झाली तर विरोधक त्याचा फायदा घेतील, हे लक्षात घेऊन पक्षातील वाद गावस्तरावर आपसात मिटवला.
याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र शेळके (PI Ravindra Shelke) यांनी सांगितले की, संगमवाडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार तेथे पोहचले.
संबंधित कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.
परंतु, त्यांनी गावस्तरावर वाद मिटविला असून कोणीही तक्रार देण्यास आले नाही.
संगमवाडी गावात सध्या शांतता आहे. (Shivaji Nagar Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’