Shivaji Nagar Assembly Election 2024 | छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार; छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

Manish Anand-Sambhaji Chhatrapati

पुणे : Shivaji Nagar Assembly Election 2024 | पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद (Manish Anand) यांना छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा (Maharashtra Swaraj Party) अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आज एस एस पी एम एस (SSPMS Ground) येथे जाहीर सभा पार पडली.

यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे दोन ठळक मुद्दे आहेत एक म्हणजे विस्थापितांना पाठबळ द्यायचं आणि आणि दुसरा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचा आहे अशांना न्याय देण्याच्या भूमिकेला आमचा पक्ष उदय झाला आहे. या मुद्या नुसार आम्ही मनिष आनंद यांना पाठिंबा देऊन अधिकृत पुरस्कृत केले आहे. गेल्या 75 वर्षात खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय याचा विचार करण्याची वेळ आली आहे, प्रस्थापित लोकांना विकासाच्या राजकारण करण्यासाठी वेळच कुठे आहे एकमेकांवर हेवेदावे करण्यासाठी त्यांचा सगळा वेळ जातो, राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे ही राजकीय नीतिमत्ताच राहिलेली नाही.

मनिष आनंद म्हणाले, मी ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं त्यांनी मला तिकीट नाकारून माझ्यावर अन्याय केला. मात्र ज्यांच्या नावाने हा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ आहे, त्यांच्या थेट वंशजांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा दिला. त्यांचा मी आभारी आहे.छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांनी मला संधी दिली तर मी नक्की या संधीचे सोने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनिष आनंद हे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात प्रामुख्याने शैक्षणिक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि बेरोजगारीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. स्वराज्य पक्षाच्या या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक बळ मिळाले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed