Shivaji Nagar Assembly Election 2024 | बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करणार – मनिष आनंद

Manish Anand

पुणे – Shivaji Nagar Assembly Election 2024 | बोपोडी (Bopodi) परिसरात असलेल्या वस्ती, झोपडपट्टी परिसरात वाहतूक कोंडी, अनियोजित विकास कामे आणि कचरा या मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढू आणि बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करू आश्वासन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद (Manish Anand) यांनी दिले.

बोपोडी परिसरातील औंध रोड आणि भाऊ पाटील रोड भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना आनंद बोलत होते.

पुढे बोलताना आनंद म्हणाले, डॉ. आंबेडकर नगर, चव्हाण वस्ती येथे वाहतूक कोंडी आणि कचरा न उललाला जाणे हि मोठी समस्या आहे, वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाशी संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल. स्पायसर कॉलेज जवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर प्रशासनाने करोडो रुपयांचा खर्च केला आहे,

मात्र या पूलाची व्यवहार्यता आधी तपासण्यात आलेली दिसत नाही कारण या पुलाचा वापरच होत नाही. असा अनियोजित विकास म्हणजे जनतेच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी आहे, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी मी बोपोडीचा नियोजबद्ध विकास आराखडा राज्य सरकारकडून मंजूर करून घेईल असेही आनंद यांनी सांगितले.

दरम्यान, आनंद यांनी आज खडकी मधील डीसेबल होमला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed