Shivaji Nagar Assembly Election 2024 | पाटील इस्टेट मधील राहिवाशांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुनर्विकास नाही – मनिष आनंद
पुणे : Shivaji Nagar Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराणे वेग घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद (Manish Anand) यांनी पदयात्रा आणि रॅली च्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. पाटील इस्टेट (Patil Estate Pune) मधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा, पुनर्विकासचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे, इथल्या एकाही कुटुंबाला वाऱ्यावर न सोडत हा प्रश्न राज्य सरकारच्या मदतीने सोडवू असे आश्वासन मनिष आनंद यांनी आज दिल. (Shivaji Nagar Assembly Election 2024)
पाटील इस्टेट भागात काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आनंद यांनी हे आश्वासन दिले.
पुढे बोलताना मनिष आनंद म्हणाले, मी आमदार झाल्यावर शिवाजीनगर मतदारसंघातील झोपडपट्टी, वस्ती विभागाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा माझा निर्धार आहे. पाटील इस्टेट मधील लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय म्हणजे या लोकांना नवीन जागी घर मिळाल्याशिवाय इथला पुनर्विकास होणार नाही यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आयडिएशन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. या सेंटर च्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांच्या भरारीला राज्य आणि केंद्र सरकारचे बळ कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’