Shivaji Nagar Assembly News | सीएम साहेब, तुम्ही नेहमी येत जावा ! गोखलेनगरकरांनी अनुभवला टपरी विरहीत परिसर आणि कोंडीमुक्त दिवस

Gokhale Nagar Pune

पुणे : Shivaji Nagar Assembly News | गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबळे मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शुक्रवारी रात्री शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात (Shivaji Nagar Assembly Election 2024) महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेच्या निमित्ताने गोखलेनगरचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. मैदानाला विळखा घातलेल्या टपर्‍या शुक्रवारी सकाळपासून गायब झाल्या होत्या. दिवसभर रस्त्यावर क्रेनसह पोलीस उपस्थित असल्याने कोठेही वाहतूक कोंडी दिसली नाही. त्यामुळे सीएम साहेब येथे नेहमी येत जावा, असे गोखलेनगर (Gokhale Nagar Pune) रहिवासी म्हणताना दिसत आहे.

गोखलेनगर हा परिसर वेताळ टेकडीमुळे आल्हाददायक आहे. पण, पूरग्रस्त वसाहतीत बेकायदा बांधकामांमुळे सर्व परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या मैदानाला लागून तीनही बाजूला टपर्‍यांचे फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. या टपर्‍यांवर खाण्यासाठी येणारी मुले, त्यांच्या उभ्या रहात असलेल्या गाड्या यामुळे सकाळ, संध्याकाळ या रोडवर वाहतूकीची कोंडी होते. बस अथवा ट्रक आला तर कोंडी हमखास होते. टपर्‍यांनी फुटपाथ व्यापला असल्याने लोकांना रस्त्यावरुन चालावे लागते. या रोडवर जुन्या पंपिग स्टेशन व बारामती होस्टेलसमोर मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असतो.

अशी सर्व परिस्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची घोषणा झाली. त्याबरोबर शुक्रवारी सकाळपासून सर्व यंत्रणांना जाग आली. मैदानाला विळखा घातलेल्या सर्व टपर्‍या अचानक गायब झाल्या. महापालिकेचे अनेक सफाई कर्मचारी रस्त्यावर दिसू लागले. त्यांनी संपूर्ण रस्ता दोन दोनदा साफ केला. रस्त्यावर कोणतेही वाहन थांबू नये, यासाठी दुपारपासून वाहतूक शाखेच्या क्रेन फिरत होत्या.

पोलीस अधिकारी, कर्मचारी संपूर्ण परिसरात, रोडवर दिसत होते. कोणत्याही वाहनाला तेथे थांबू देत नव्हते. त्यामुळे पीएमपी बस विना अडथळा धावत होत्या. बसस्टॉपवर प्रवाशांच्या उभे राहण्यास जागा मिळाली. नाही तर खाणार्‍या लोकांचीच त्यावर गर्दी असायची. सेनापती बापट रोडवरुन गोखलेनगरकडे येणार्‍या रोडवरील सर्व टपर्‍या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व परिसर वाहतूककोंडी मुक्त व स्वच्छ दिसत होता. सभा संपल्यानंतर शनिवारी पुन्हा सर्व टपर्‍यांचा मैदानाला विळखा पडु लागला आहे. जे एक दिवस जमते ते नेहमी का जमू नये, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्ही नेहमी येत जावा, त्यानिमित्ताने तरी आम्हाला स्वच्छ व कोंडीमुक्त दिवस अनुभवण्यास येईल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल

You may have missed