Shivaji Nagar Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | पहिला विवाह झाला असतानाही लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तरुणीबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्याचे लग्न झाल्याचे समजल्यावर तिला घटस्फोट देणार असल्याचे सांगून गावी भेटायला बोलावून तरुणीला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत २९ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित अंकुश नप्ते Amit Ankush Napte (वय २९, रा. करंदी, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील फिर्यादीच्या घरी तसेच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ३१ जुलै २०२२ ते ३० ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला. (Rape Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. अमित याने फिर्यादीला लग्न करणार असल्याचे सांगून कारमधूून शिवाजीनगर येथील एका हॉटेलवर नेले. तेथे तुला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे नसेल तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही़ तुझा माझ्यावर विश्वास नाही, असे बोलून तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. फिर्यादीला त्याचे यापूर्वी लग्न झाले असल्याचे समजले. त्याबाबत विचारपूस केली असता त्याने फिर्यादीला बायकोसोबत घटस्फोट घ्यायचा असून मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले. तसेच फिर्यादीला आरोपीचे राहते घरी शिक्रापूर येथे घरच्यांना भेटवतो, या बहाण्याने बोलवले. तेथे अमित फिर्यादीला शिवीगाळ करुन अंगावर धावून आला. त्याच्या वडिलांनीही फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आमची खूप वरपर्यंत ओळख आहे. मला कुणी काही करु शकत नाही. तुला खोट्या केसमध्ये अडकवीन अशी धमकी दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत. (Shivaji Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद