Shivaji Nagar Pune Crime News | बहु विकलांग महिलेचा वडिलोपार्जित हिस्सा संपुष्टात आणण्यासाठी तयार केला बनावट पुरावा; बांधकाम व्यावसायिक मनोज बहिरट विरोधात गुन्हा दाखल

fraud

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर येथील २ खणाची एक खोली लबाडीने विश्वास संपादन करुन फसवणूक (Cheating Fraud CAse) करुन बांधकाम व्यावसायिकाने बळकावली. आता बहुविकलांग महिलेचा वडिलोपोर्जित हिस्सा संपुष्टात आणून भविष्यात मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकाने बनावट पुरावा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) मनोज बहिरट (Manoj Bahirat Builder) आणि त्यांची पत्नी सोनल मनोज बहिरट (रा. पायको व्हील उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विवेक राजाराम क्षीरसागर (वय ६०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भाची अश्विनी सुशिल खळदकर या जन्मत: बहु विंकलांग आजाराने ग्रस्त आहे. तिचे वडिल व आई यांचे निधन झाले आहे. फिर्यादी हे तिचे दूरचे मामा आहे. काँग्रेस भवन मागे बुवा आईस्क्रिम बिल्डिंगमध्ये खळदकर राहतात. अश्विनीच्या तळमजल्यावरील राहते घर बळविण्याच्या उद्देशाने तिचा वडिलोपार्जित हिस्सा संपुष्टात आला आहे, हे भासविण्याकरीता बांधकाम व्यावसायिक मनोज बहिरट व त्यांची पत्नी सोनल बहिरट यांनी मेघना अभय काटेकर व अश्विनी खळदकर यांनी सुधा ज्ञानेश्वर बहिरट यांना ५ सप्टेबर २०१४ रोजी त्यांच्या हिस्स्याची खरेदी दिलेली आहे, असा दस्त तयार केला.

त्यात प्रदीप खळदकर व सुशिल खळदकर यांचा व वारसांचा या मिळकतीमध्ये कोणत्याही स्वरुपामध्ये हक्क राहिलेला नाही, असा मजकूर नमूद केला आहे. अश्विनी चा हिस्सा गिळंकृत करण्याच्या उद्देशाने खोटा व बनावट मजकूर तयार करुन दस्ताचे बनावटीकरण केलेले आहे. (Shivaji Nagar Pune Crime News)


तसेच मनोज बहिरट याने बुवा आईस्क्रीम बिल्डिंग या मिळकतीच्या महानगर पालिकेकच्या टॅक्सवरील अश्विनीचे वडिल सुशिल खळदकर यांचे नाव कमी करुन घेतले. त्या जागी मनोज व सोनल बहिरट यांनी स्वत:ची नावे लावले आहे. अश्विनीच्या सुरक्षितेच्या हेतूने राहते घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असताना त्याने त्याची तोडफोड करुन अश्विनी हिस मारहाण केली. तेथील डिव्हीआर चोरुन नेला आहे. याबाबत २०२२मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी व तिची मोठी बहिण मेघना काटेकर यांना तो वेगवेगळ्या मार्गाने धमकावत आहे.
यापूर्वी अश्विनीच्या तळमजल्यावरील २ खणांची एक खोली मनोजने अश्विनीची बहिण मेघना व
फिर्यादी यांचा लबाडीने विश्वास संपादन करुन त्यांची फसवणूक करुन बळकाविलेली आहे.
अश्विनीचे घरासाठी असणारे महानगरपालिकेच्या पाण्याचे कनेक्शन ८ जून २०२४ रोजी तोडून टाकलेले आहे.
अश्विनी ही विकंलाग असल्याने तिच्या मृत्यु पश्चात खोट्या मजकूराचा मृत्युपत्रास पर्यायी मार्ग म्हणून भविष्यात वापरायचा षडयंत्र आहे.
खोटा व बनावट पुरावा अस्तित्वात आणला आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सविता सपकाळे (PSI Savita Sapkale) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed