Shivaji Nagar Pune Crime News | पुण्यात बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री; दोघे पोलिसांच्या ‘जाळ्यात’

Shivaji Nagar Pune Crime

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | व्यायाम शाळेत काही तरूणांना शरीरयष्टी चांगली होईल असे आमिष दाखवून, स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून ५ हजार रूपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सांवत (PI Chandrashekhar Sawant) यांनी दिली आहे. या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर (Deepak Baburao Wadekar) आणि साजन अण्णा जाधव (Sajan Anna Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DD4IsHDzPoA/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आरोपींकडे औषध बिल नसताना, औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्यावर गंभीर इजा होऊ शकते. ही बाब माहित असूनही बेकायदेशीररित्या याची विक्री केली जात होती. स्टेरॉईड इंजेक्शन त्यांनी कोठून आणलं? ते कुणाला विक्री करणार होते? त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत? याबाबत शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत. (Illegal Sale Of Steroid Injections In Pune)

बॉडी बनवण्यासाठी युवकांना स्टेरॉईड इंजेक्शनचे आकर्षण असते. मात्र, स्टेरॉईडचं जितक्या लवकर परिणाम दिसून येतात, तितक्या लवकर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. स्टेरॉईडचा वारंवार वापर केल्याने पुरूष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो स्टेरॉईड इंजेक्शन घेणे टाळले पाहिले असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. (Shivaji Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार