Shivaji Nagar Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद; गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांची कारवाई

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणार्या (Demand Of Extortion Money) सराईत गुन्हेगार (Criminal On Police Record) गुन्हा करण्यासाठी पिस्टल घेऊन थांबला असताना पोलिसांनी त्याचा पकडले.
https://www.instagram.com/p/DAQlzBnCOWm/?img_index=1
आंबाजी कल्याणी शिंगे Ambaji Kalyani Shinge (वय २४, रा. नवीन म्हाडा कॉलनी, ससाणेनगर, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आंबाजी शिंगे याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police) हत्यार बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाला ३५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) अटक केली होती. त्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्याने आंबाजी शिंगे व त्याच्या साथीदाराने आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठून खंडणी मागितली होती. त्याला वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक केली होती.
https://www.instagram.com/p/DAQi-1ZJRTB
याबाबत पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तसेच सहायक पोलीस निरीक्षक पांढरे, हवालदार चव्हाण, पवार, पोलीस अंमलदार जाधव हे २२ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नाना नानी पार्क जवळील सुलभ शौचालय येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार आंबाजी शिंगे हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्टल आहे. या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तेथे पोहचले. पोलिसांनी सापळा रचून आंबाजी शिंगे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व एक जिंवत काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक संजय पांढरे (PSI Sanjay Pandhare) तपास करीत आहेत. (Shivaji Nagar Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAQWpLbiIOE
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”