Shivaji Nagar Pune Crime News | 53 महागडे मोबाईल परराज्यातून हस्तगत करण्यात शिवाजीनगर सायबर पथकाला यश; 11.50 लाखांचे मोबाईल केले परत

Shivaji Nagar Police

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | लोकांचे हरवलेले मोबाईलचा डेटा तयार करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन वारंवार पाठपुरावा करुन हे ५३महागडे मोबाईल विकत घेतलेल्या विविध जिल्हे व परराज्यातील ग्राहकांकडून परत मिळविण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) सायबर पथकाला यश आले आहे. असे ११ लाख ५० हजार रुपयांचे हरवलेले महागडे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. (Mobile Theft Case)

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, हवालदार रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन त्याचा तांत्रिक तपास केल्यावर त्यातील अनेक मोबाईल विविध जिल्ह्यात तसेच इतर राज्यात विक्री होऊन वापरले जात असल्याचे दिसून आले. त्यांनी हे मोबाईल वापरत असलेल्यांना तुमच्याकडील मोबाईल हा चोरीचा आहे, असे सांगून त्याबाबतची कायदेशीर गोष्टी समजावून सांगितल्या. कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अश विविध भाषांमध्ये संवाद साधून त्यांना हे चोरीचे मोबाईल परत पाठविण्यास सांगितले. त्यातील ११ लाख ५० हजार रुपयांचे ५३ महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हस्तगत करण्यात आलेले हे मोबाईल फोन अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. (Shivaji Nagar Pune Crime News)

मोबाईल हरवला तर हे करा

आपण प्रवास करताना बसमध्ये चढताना अगर उतरताना आपले मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू संभाळावे. प्रवासात मोबाईल चोरीला गेल्या तात्काळ ११२ नंबरवर संपर्क करावा. मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांचे punepolice.gov.in/lostfoundReg या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंदवावी. त्या तक्रारीची एक कॉपी जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. त्यानंतर हरवलेले मोबाईलमधील त्याच नंबरचे नवीन सीमकार्ड घेऊन ते चालू करुन घ्यावे. त्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in/(CEIR) या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना या वेबसाईवर अर्जदाराचे तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची पीडीएफ अपलोड करुन चालू केलेल्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त करुन सबमिट करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, पोलीस शिपाई आदेश चलवादी, रोहित झांबरे रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

दीड वर्षात अडीचशे मोबाईल हस्तगत

पोलीस शिपाई आदेश चलवादी यांची दीड वर्षांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सायबर पथकात नियुक्ती झाली.
तेव्हापासून हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करुन ते इतरत्र सुरु असलेल्या वापरकर्त्यांशी संपर्क साधणे.
त्यांना हा मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून तो पुन्हा पोलीस ठाण्यात पाठविण्यास ते सांगत असतात.
त्यासाठी त्यांना कन्नड, तेलगु या भाषा येत असल्याने दक्षिणेत विकल्या गेलेल्या मोबाईल वापरणार्‍यांशी ते
त्यांच्या भाषेत बोलून त्यातील कायदेशीर बाजू समजावून सांगून ते पुन्हा हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात.
आतापर्यंत त्यांनी जवळपास अडीचशे मोबाईल हस्तगत केले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed