Shivaji Nagar Pune Crime News | LIC पॉलिसीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणाऱ्या फ्रॉड कॉल सेंटरचा शिवाजीनगर पोलिसांकडून पर्दाफाश (Video)
150 सिम कार्ड, 30 बँक खाती, चेक बुक, 15 मोबाईल, 21 डाटा रजिस्टर, 12 एटीएम कार्ड, 5 पॅन कार्ड, 35 कंपन्यांचे बनावट शिक्के जप्त
पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | एल आय सी एजंट (LIC Agent) असल्याचे भासवून त्यांना एल आय सी पॉलिसी विकत देण्याच्या नावाखाली फसवणुक करणारे बनावट कॉल सेंटर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police) सायबर सेलने (Cyber Cell Pune) उघडकीस आणले आहे. ते चालविणार्या तिघांना अटक केली आहे. तब्बल पावणे दोन वर्षानंतर गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. (Cheating Fraud Case)
https://www.instagram.com/p/DFiCAzGJD9t
सध्याचे फ्युटचर इन लाईफ आताचे फ्युचर ग्लोबल सर्व्हिस नावाने वेळोवेळी फ्रॉड कॉल सेंटर चालविणारे मुख्य सुत्रधार शंकर कारकुन पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफुज मेहबुब सिद्धकी/शेख (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या छाप्यात विविध कंपन्यांचे १५० सिम कार्ड, ३० बँक खाती, चेक बुक, १५ मोबाईल, २१ डाटा रजिस्टर, १२ एटीएम कार्ड, ५ पॅन कार्ड, ३५ विविध कंपन्यांचे बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत. (Arrest In Fraud Case)
ही फसवणुक २०२१ पासून सुरु होती़ ज्येष्ठ नागरिकांना एल आय सी कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून तसेच कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगून विश्वास संपादन करत. फिर्यादीच्या घरी जाऊन एल आय सीचे स्किम सांगून फिर्यादी यांची ५ लाख ४ हजार १६७ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. २०२२ मध्ये फिर्यादी यांनी खात्री करण्यासाठी फोन लावले असता आरोपीचे फोन बंद झाल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरुन त्यांनी २०२३ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (Sr PI Chandrashekhar Sawant) यांनी गुन्ह्याचे गाभिंर्य लक्षात घेऊन सायबर पथकाकडे हा तपास करण्याचा आदेश दिला होता. सायबर तपास पथकामधील पोलीस अंमलदार आदेश चलवादी व तेजस चोपडे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन अत्यंत कुशलतेने माहिती काढून फ्रॉड कॉल सेंटरचे अचूक ठिकाण निष्पन्न केले. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून बनावट कॉल सेंटरवर (Bogus Call Center) छापा टाकला.
या कॉल सेंटरमध्ये एनबीएफसी, इन्फ्रा ब्रँड, सुहाना कन्स्ट्रक्शन अॅन्ड फायनान्स, एम एस एंटरप्रायजेस, गायत्री डेव्हलपर्स अॅन्ड कन्स्ट्रक्शन, एबी कन्स्ट्रक्शन, शिंदे एंटरप्रायजेस, फ्युचर इन्वेस्टमेंट सर्व्हिसेस, एबी डी गोळे अॅन्ड असोसिएट चार्टर,अकाऊंट, फ्युचर फिन्संर प्रायव्हेट लि़ फ्युचर लाईफ निधी लि़ शिवसाई एटंरप्रायजेस, लोकमान्य चारिटेबल ट्रस्ट, शिवाजी व एस एस टुरस अन्ड ट्रॅव्हल्स, फ्युचर ग्लोबर सर्व्हिसेस अशा विविध नावे व कंपन्यांचे रबरी शिक्के मिळून आले. आरोपीकडे त्यांची एनबीएफसी व एलआयसीचे नावाने तयार केलेले ओळखपत्रे प्राप्त झालेली आहेत. आरोपी हे स्वत:ची ओळख लपवून वेळोवेळी ऑफिस व राहण्याचे ठिकाण बदलत होते. पोलीस अंमलदार आदेश चलवादी व तेजस चोपडे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा अतिशय चिकाटीने माग काढत आरोपी निष्पन्न करुन यशस्वीरित्या फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.
ज्यांची एलआयसी पॉलिसी देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली असेल त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांनी केली आहे. (Shivaji Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा