Shivaji Nagar Pune Crime News | सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलासह जेरबंद ! शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

Shivaji Nagar Police

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकांना खंडणी (Deamnd Of Extortion Money) मागण्यासह विविध ६ गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार (Criminal On Police Record) गुन्हा करण्यासाठी आला असताना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) त्याला गावठी पिस्टलासह जेरबंद केले.

https://www.instagram.com/p/DAVLy7vJwYR

आंबाजी कल्याणी शिंगे Ambaji Kalyani Shinge (वय २४, रा. नवीन म्हाडा कॉलनी, ससाणेनगर, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आंबाजी शिंगे याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्यार बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाला ३५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa) अटक केली होती. त्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्याने आंबाजी शिंगे व त्याच्या साथीदाराने आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठून खंडणी मागितली होती. त्याला वानवडी पोलिसांनी (Wanwadi) अटक केली होती. हत्यार बाळगल्याप्रकरणी हडपसर (Hadapsar Police) व सासवड पोलिसांनी (Saswad Police) त्याला अटक केली होती.

https://www.instagram.com/p/DAVSil4J4At

याबाबत पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तसेच सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, दाबेराव, हवालदार दीपक चव्हाण, मोहिते, साठे, पवार, पोलीस अंमलदार सचिन जाधव, वलटे हे २२ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नाना नानी पार्क जवळील सुलभ शौचालय येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार आंबाजी शिंगे हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्टल आहे. या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोहचले. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले़ त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे ३६ हजार रुपयांचे गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAVUdsFp-LV

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill) , सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे (ACP Sainath Thombre) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (Sr PI Chandrashekhar Sawant), सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे (API Sanjay Pandhare), कैलास दाबेराव (Kailas Daberao), हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, अतुल साठे, राजकिरण पवार, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAVgdsDp4oI

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed