Shivaji Nagar Pune Crime News | गणेश मंडळातील धातूची पंचारती, ताम्हणासह साहित्या चोरणार्‍या चोरट्यास अटक

Pune Crime News | Dhayari: Externed Man Held for Allegedly Brandishing Sickle and Threatening Residents; Nanded City Police Make Arrest

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणातील गणेश मंडळाच्या मंडपातील पितळी धातूची पंचारती, ताम्हण, गडवा असे साहित्य चोरुन नेणार्‍या चोरट्यास शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) अटक केली आहे.

सचिन दिगंबर वर्‍हाडे (वय ४६, रा. गुंडाचा गणपती शेजारी, कसबा पेठ) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रणव मेमाणे (वय २५, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ सप्टेबर रोजी रात्री सव्वा नऊ ते १६ सप्टेबर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. (Arrest In Theft Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गणेश मंडळ व शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, गणपती चौक गावठाण या गणेश मंडळातून पितळी धातूची पंचारती, तांबे, ताम्हण, गडवा असा ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या चोरीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरुन सचिन वर्‍हाडे याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार जाधव तपास करीत आहेत. (Shivaji Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed