Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)

Shivaji Road Accident Pune

पुणे : Shivaji Road Pune Accident News | शिवाजी रोडवर एका मद्यधुंद कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर त्याने पळून जाताना अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी त्याला दीप बंगला चौकात (Deep Bangla Chowk) लोकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) त्याची मेडिकल टेस्ट करुन त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या (Khadak Police) ताब्यात दिले. (Drunk Driver Hit Motorcycle)

https://www.instagram.com/p/DD_ZDyHJLXj

दयानंद केदारी (Dayanand Kedari) असे या कारचालकाचे नाव आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील (Sr PI Vijayanand Patil) यांनी सांगितले की, शिवाजी रोडवर प्यासा हॉटेलसमोर (Hotel Pyasa) एका कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातानंतर कारचालक पळून जात असताना त्याने आणखी काही वाहनांना धडक दिली. मोटारसायकलचालकाने त्याचा पाठलाग केला. त्याला दीप बंगला चौकात अडविले. तेथे लोकांनी त्याला पकडून ठेवून चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan) यांनी सांगितले की, हा कारचालक एका हॉटेलमध्ये किचन मॅनेजर आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याची मोटारसायकलला धडक बसली. त्यानंतर त्याने अनेक वाहनांना धडक दिली. परंतु, ही धडक किरकोळ असल्याने कोणीही तक्रार न करता निघून गेले. खाली पडलेल्या मोटार सायकलचालकाने या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यात पळून जाताना त्याने आणखी काही जणांना धडक दिली. दीप बंगला चौकात त्याला लोकांनी पकडले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. (Shivaji Road Pune Accident News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed