Shivraj Patil Chakurkar Passes Away | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास

Shivraj Patil Chakurkar Passes Away | Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar Passes Away

लातूर : Shivraj Patil Chakurkar Passes Away | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी पहाटे लातूरमधील त्यांच्या “देवघर” या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे आणि दीर्घ आजारपणामुळे काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदे भूषवली. देशाच्या संसदीय आणि संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

१२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे त्यांचा जन्म झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सात वेळा विजय मिळवला. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केले. यापूर्वी संरक्षण मंत्री (१९८०चे दशक) आणि लोकसभेचे १०वे अध्यक्ष (१९९१–१९९६) अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक होते.

You may have missed