Shivsena Shinde Group Leader Gulabrao Patil | गृहखात्यावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले – ‘त्यात गैर काय?’

Gulabrao Patil-Eknath Shinde

मुंबई : Shivsena Shinde Group Leader Gulabrao Patil | राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीकडे (Mahayuti Govt) गृह व महसूलमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने त्यास सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी निघून गेल्याची चर्चा आहे.

यावरून शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. “राज्यातील जनतेने अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांना इतकं प्रेम दिलं आहे की त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. मुळात तो शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही”, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ” एखादे खाते मागणे ही काही चुकीची गोष्ट नव्हे. प्रत्येक पक्षाचे ते काम आहे. शेवटी आम्ही महायुतीत तीन महत्त्वाचे पक्ष आहोत. प्रत्येकाला सत्तेत आपापला वाटा हवा आहे. त्यामुळे युतीत, आघाडीत एखादे खाते मागू नये असे कोणी सांगितलेले नाही. मागितल्यावर मिळेलच असेही काही नाही. मात्र, आम्ही आम्हाला हवं ते खातं मागू. त्यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि ते निर्णय आम्हा सर्वांना मान्य असतील”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे. (Shivsena Shinde Group Leader Gulabrao Patil)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed