Shivsena Shinde Group Leader On Uddhav Thackeray | “काळ्या दगडावरची पांढरी रेघ, उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”, 50 खोक्यावरून शहाजीबापू पाटलांचे वक्तव्य

पंढरपूर: Shivsena Shinde Group Leader On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि शिंदे गटात कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. शिंदे गटाशी संबंधित ‘मला काहीतरी सांगायचंय’ हे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. यातून शिवसेना फुटीची कथा दाखवली जाणार आहे. याला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाने ‘५० खोके एकदम ओके’ हे नाटक रंगमंचावर आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘काय झाडी, काय डोंगर’ हा शहाजी बापू पाटलांचा डायलॉग शिवसेना बंडाच्यावेळी प्रसिद्ध झाला होता.
‘५० खोके एकदम ओके’ या नाटकावर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले, ” उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवावा सांगावे की पन्नास खोके दिले. मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो”, असे थेट आव्हान शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे यांना दिले आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या कामाची माहिती राज्याचे व्हिजन याबाबत काही सांगण्याची गरज नाही. राज्यातील सर्व जनतेला त्यांच्या कामाबद्दल माहिती आहे. उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या तोंडावर फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. जनमत बनवण्यासाठी ते काही नाटके करत असतील”, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरे गटाच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ येईल की ते म्हणतील आम्हाला एक पण जागा नको पण मला मुख्यमंत्रीपद द्या. पण ते काही मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!