Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘…तर राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार’

मुंबई: Shivsena Shinde Group News | आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) एकीकडे जागावाटपाची तयारी सुरु असताना दुसरीकडे सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा असणार याबाबत रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
https://www.instagram.com/p/DAz8W8YJ20_
जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. मविआ उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असाही दावा त्यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DAz9kqwC8hK
दीपक केसरकर म्हणाले, ” उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने ठाकरेंची फसवणूक केली. पण जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही”, असा दावा मंत्री केसरकर यांनी केला.
https://www.instagram.com/p/DA0DKugJoEc
“आजपर्यंत मातोश्रीवरचा कुठलाही नेता सोनिया गांधी यांच्याकडे गेला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. बाळासाहेबांनी एक वेळ पक्ष नाही राहिला तरी चालेल पण काँग्रेसबरोबर जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. मात्र या सर्व भूमिकांना उद्धव ठाकरे यांनी छेद दिलाय”, असा आरोपही केसरकर यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा