Shivsena Shinde Group | आमदार नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडणार; अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी
भंडारा : Shivsena Shinde Group | राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भंडाऱ्याचे (Bhandara Assembly Constituency) अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar MLA) शिवसेना शिंदे गटासोबत गेले होते. मात्र भोंडेकर हे महायुतीवर नाराज असून शिवसेनेची उमेदवारी न घेता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहेत.
मंत्रीपद असो किंवा महामंडळ याची अपेक्षा असताना महायुतीने भोंडेकर यांना डावलल्याने ते महायुतीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा ठराव घेतल्याने भोंडेकर महायुतीवर प्रचंड नाराज असून अपक्ष लढण्याच्या भूमिकेत आहेत.
नरेंद्र भोंडेकर म्हणाले, ” मी मुळात अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या आग्रहामुळं मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुळात मी शिवसैनिकच आहे. त्यामुळे आगामी काळात मी घरी बसणार नाही. तर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी माझी सुरू आहे.
२०१९ मध्ये ज्या पद्धतीने अपक्ष निवडणूक लढली, तशीच आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सत्ता बदलाच्या वेळी सर्वात पहिले मी गेलो. त्यामुळं मला काय द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे आणि का नाही दिलं? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देतील.” असे भोंडेकर यांनी म्हंटले आहे. (Shivsena Shinde Group)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”
Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’
