Shivsena UBT News | ‘जागावाटप कधी पूर्ण करायचे हा स्ट्रॅटेजीचा भाग’, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Uddhav Thackeray

मुंबई : Shivsena UBT News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपावरून बैठका घेऊन मित्रपक्षांमध्ये चर्चा केल्या जात आहेत. याच जागावाटपावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याकडून भाष्य करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण विभागांच्या चर्चा फेऱ्यांमध्ये सुरू आहेत. मुंबईची चर्चा सुरू असताना काही गोष्टी इतर पक्षांना सुद्धा सांगायच्या आहेत. जागा वाटपात कुठलाही विषय अडकलेला नाही. किंबहुना जागावाटप कधी पूर्ण करायचे हा स्ट्रॅटेजीचा भाग असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पद मिळाल्यानंतर त्यांना स्वतः लाच काही स्वप्न पडत आहेत. भाजपच्या नेत्यांना वाटतंय की इकडचं नेतृत्व जर केंद्रात केलं तर मग कोणाचा नंबर लागणार, आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या घरात नेमकं काय चाललं आहे हे बावनकुळे यांनी बघावं. महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हे आधी बावनकुळे यांनी बघावं, अशी टीकाही आमदार सचिन अहिर यांनी केली.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी जर गुंडांकडे जाऊन चहापाणी करत असेल, त्यांच्या भेटी घेत असतील. तर अशा गोष्टी पुण्यात होणे दुर्दैवाने स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या होते आणि पोलीस म्हणतात अंतर्गत वाद आहे.

अंतर्गत वादात पिस्तूल हत्यार आली कुठून? कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यामध्ये राहिलाच नाहीये का? मी पुणे शहराचा पालकमंत्री राहिलेलो आहे.
तेव्हा असे प्रकार होत असताना याला जबाबदार कोण?, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed