Shivsena UBT On Ajit Pawar | ‘अजित पवारांवर कसला दबाव?’, शिवसेना ठाकरे गटाने डिवचलं, म्हणाले – ” आधी भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लागायचे, आता…”
मुंबई : Shivsena UBT On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत असणार आहे. मात्र महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला याचे सर्व खापर अजित पवारांवर फोडण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) महायुतीत अजित पवारांच्या समावेशावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भाजप (BJP) तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून (Shivsena Shinde Group) सातत्याने अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी अजित पवार गटासोबत (Ajit Pawar NCP) मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसत जरी असलो तरी उलट्या होतात असे वक्तव्य भर सभेत केले होते.
यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असे ऐकून घेण्यापेक्षा महायुती सरकारमधून बाहेर पडलेले बरे, असे अजित पवारांना म्हंटले होते. आता यावर ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे.
महायुतीमध्ये अंतरकलह लोकांच्या समोर आला आहे. ज्या प्रकारे तानाजी सावंत म्हणाले अजित पवार आणि त्यांचे नेते यांना बैठकीत बघतो त्यावेळी उलटी आल्यासारखे होते. त्यानंतरही अजित पवार आणि त्यांचे नेते काही बोलत नाहीत. त्यांच्यावर कसला दबाव आहे? असा सवाल ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dube) यांनी उपस्थित केला आहे.
ती वेळ होती जेव्हा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागायचे. त्यांचा इतका अपमान होत आहे,
कधी भाजपकडून कधी आरएसएस, कधी शिंदे गटाकडून.
अजित पवार यांच्यावर ईडी (ED) सीबीआयचा (CBI) दबाव आहे का? असा सवाल दुबे यांनी केला आहे.
तसेच अजित पवार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असते तर असे झाले नसते.
तुम्ही अडीच वर्ष महाविकास आघाडीमध्ये होता, पण मित्रपक्ष कधीही तुम्हाला असे बोलले नाहीत.
तुमची परिस्थिती दुर्दैवी झाली आहे. मग का सहन करत आहात, असा सवाल दुबे यांनी विचारला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद