Shivsena UBT On Amol Kolhe | ‘ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही’, अमोल कोल्हेंच्या भाष्यावर अंबादास दानवेंची खोचक टीका; म्हणाले – ‘अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार’

Uddhav Thackeray-Amol Kolhe

मुंबई : Shivsena UBT On Amol Kolhe | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. या निवडणुकीत विरोधी पक्षनेता निवडता यावा एवढ्या जागाही मविआमधील एकाही पक्षाला मिळवता आल्या नाहीत. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. ” ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांनी भर सभेत केले होते. यावरून ठाकरे गटाने कोल्हेंना ते हवेवर निवडून येणारे खासदार असल्याचे म्हटले आहे.

पक्षातील आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” राज्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे. “

अमोल कोल्हेंच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, ” जाग यावी असे कोण म्हणाले मला माहिती नाही. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत २०-३० वर्षे झिजावे लागते ते त्यांना माहित नाही.
त्यांनी त्याचे मत व्यक्त केले आहे. एखादा पराभव आणि विजय एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो, मविआ फुटत नाही.
संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत”,
असे दानवे यांनी म्हंटले आहे. (Shivsena UBT On Amol Kolhe)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed