Shivsena UBT On Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री हे लोचट मजनू …’ मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा निशाणा, “ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी…”

Uddhav Thackeray-Eknath Shinde

अकोला : Shivsena UBT On Eknath Shinde | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) पुढील दोन महिन्यात पार पडतील अशी चर्चा आहे. लोकसभेप्रमाणेच महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना होणार आहे. दरम्यान दोन्हींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

“मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही पाहिले नाहीत. मात्र, ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल, त्या दिवशी दिल्ली त्यांना पायाशीही उभं करणार नाही”, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ” राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. काल बुलढाण्यात होतो. आज अकोल्यात आहे. या राज्यातील वातावरण असे आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ताबदल होईल.

हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीमधून किती उधळपट्टी करत आहे? लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले पाहिजेत. त्यांचा १५०० रुपयांचा आकडा आहे. मात्र, पुढे जर आमचं सरकार आले तर त्यामध्ये भरघोस वाढ होईल”, असे संजय राऊत यांनी सांगितले. (Ladki Bahin Yojana)

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सावत्र भाऊ कोणीही नाही. जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे सावत्र भाऊ नाही तर ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचे नुकसान केले आहे.

त्यांनी जेवढं नुकसान केले तेवढे गेल्या १०० वर्षात कोणीही केले नाही.
आताचे मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत.
याआधी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, यांच्याएवढा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री पाहिला नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत.
पण ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशीही उभं करणार नाही”,
असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed