Shivsena UBT Pune | पुणे शहरातील 4 जागांचा दावा शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे करणार; विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणीस सुरुवात
पुणे : Shivsena UBT Pune | एकेकाळी चार विधानसभा मतदारसंघ (Maharashtra Assembly Election 2024) ताब्यात असणाऱ्या पुण्यात शिवसेनेला मागील अनेक वर्षे राजकीय वनवासात काढावी लागली आहेत. शिवेनसेत फूट पडल्यानंतर राजकीय शक्ती आणखीनच कमी झाली आहे.मात्र शनिवार (दि.३) होणाऱ्या मेळाव्यात शिवसैनिकांना संजीवनी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. राज्यातील अन्य शहरांबरोबरच पुण्यातूनही त्यांनी अनेक अपेक्षा ठेवल्या असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शहर शिवसेनेच्या मेळाव्याला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी गणेश कला क्रीडा मंडळाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे.
जिल्ह्यातील गटप्रमुखांनाही मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), अंबादास दानवे (Ambadas Danve), सचिन अहिर (Sachin Ahir) यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे यांच्याकडे मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतूनच शिवसेना निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची शहरात विशेष राजकीय ताकद नाही. शिवसेनेकडे तरुणाईचे जाळे आहे. त्यामुळे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट या मतदार संघाबरोबरच कसबा विधानसभा मतदारसंघाचाही दावा शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी करणार असल्याची चर्चा आहे.
दिवंगत काका वडके, नंदू घाटे यांनी शिवसेनेला पुण्यात चळवळीची तर शशिकांत सुतार यांनी राजकीय ओळख मिळवून दिली. सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर हा कोथरूडचा गौरव सुतार यांच्यामुळेच झाला. महापालिकेतील कारकिर्द गाजवल्यानंतर ते शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून २ वेळा निवडून गेले. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत कोथरूडचा पहिला आमदार म्हणून शिवसेनेच्याच चंद्रकांत मोकाटे यांनी संधी मिळाली.
दरम्यानच्या काळात दिवंगत विनायक निम्हण यांनी शिवसेनेकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांवर दोन वेळा झेंडा रोवला.
कॅन्टोन्मेंट मध्येही दिवंगत सूर्यकांत लोणकर आमदार झाले. महापालिकेतही शिवसेनेचे ८ ते १० नगरसेवक निवडून येत.
या राजकीय यशाला ओहोटी लागली त्यालाही आता अनेक वर्षे झाली.
शिवसेनेचा पुणे शहरात गेली अनेक वर्षे एकही आमदार नाही.
नगरसेवकही एक अंकी संख्येतच निवडून येत आहेत. खासदारकीचे नावच नाही.
सुरूवातीला भाजप बरोबर व आता महाविकास आघाडीबरोबर शिवसैनिकांची फरपट सुरू असल्याची खंत अनेक जुन्या शिवसैनिकांना आहे.
त्यातच राज ठाकरे यांनी बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली.
त्यानंतर पुन्हा अलीकडेच फूट पडल्यामुळे शिवसेनेची शहरातील राजकीय शक्ती आणखीनच कमी झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांनी किंवा शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांनीही मुंबई नंतर ठाणे,
कल्याण इकडेच लक्ष केंद्रीत केले. पुण्यातून राजकीय बळ मिळत नसल्याने नेत्यांचेही पुण्यातील लक्ष कमी झाले,अशी सध्या चर्चा आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा