Shivsena UBT | राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य म्हणाले – ‘यावेळी काही ना काही…’

Uddhav Thackeray

संभाजीनगर : Shivsena UBT | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यात या निवडणूका पार पडतील अशी चर्चा आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनीही दौरे सुरु केलेले आहेत. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) असा सामना रंगणार आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची (NCP Shivsena MLA Disqualification Hearing) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी ७ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठे विधान केले आहे. “ यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल”, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदार प्रकरणाची ७ तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल. आता आमच्या जिल्ह्यामधील पाच जण फुटलेले आहेत. त्यातील चारजण हे अपात्र प्रकरणामधील १६ आमदारांमध्ये आहेत”

ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मला जर सांगितले की तुम्ही विधानसभा लढवा आणि निवडणुकीत गद्दारांचा पराभव करण्यासाठी तुम्हीच सक्षम उमेदवार आहात, असे ते म्हणाले तर माझी निवडणूक लढवण्याची तयारी आहे. सध्या तरी मी उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीबाबत काहीही बोललो नाही. मात्र, यावेळी महाविकास आघाडीचा एक-एक उमेदवार निवडून आला पाहिजे, हे पाहून उमेदवारी दिली जाणार आहे”, असं चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची नियुक्ती करण्यात आली. यावर बोलताना ते म्हणाले, ” अजून एक दोन महिने जाऊद्या मग माहिती पडेल की ते पालकमंत्री म्हणून कसं काम करतात. मात्र, एक-दोन महिन्यांत हे सरकारच जाणार आहे. मग काय होणार? त्यामुळे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील”, अशी टीका खैरे यांनी केली.

“मराठा आरक्षणाबाबतची (Maratha Reservation) भूमिका उद्धव ठाकरे स्पष्ट करतील.
मात्र, संजय शिरसाट (Sanjay Sirsat) बोलले की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. मग संजय शिरसाट कोण सांगणारे?
ते तर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत ना? मुख्यमंत्री जे बोलतात ते करत नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत”,
असे म्हणत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार