Shivsena Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा 3 ऑगस्टला पुण्यात मेळावा; अमित शहांना ठाकरे स्टाईलने प्रत्युत्तर भेटणार?

Uddhav Thackeray

पुणे : Shivsena Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. मविआ (Mahavikas Aghadi) एकत्र येऊन जागावाटपाचा तिढा सोडवणार असली तरी निवडणूक लढण्याबाबत त्या-त्या पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा येत्या ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निमित्ताने या पक्षाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

पक्षपातळीवर बैठका, संघटनात्मक बांधणी बरोबरच मेळावे सुरू झाले असतानाच शिवसेनेकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कसबा (Kasba Assembly Constituency) , हडपसर (Hadapsar Assembly Constituency) आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावर (Kothrud Assembly Constituency) शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. यातील कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची ताकद आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे बोलले जात आहे. (Shivsena Uddhav Thackeray)

दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch) येथे हा मेळावा होण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याच्या दृष्टीने शहर पातळीवर नियोजनही सुरू करण्यात आले आहे.
पुण्यात नुकतेच भाजपचे महाअधिवेशन पार पडले यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)
आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.
शहा यांनी उद्धव ठाकरे हे ‘औरंगजेब फॅन क्लब’ चे (Aurangzeb Fan Club) नेते असल्याचे म्हणत निशाणा साधला होता.
त्याबाबत आता होऊ घातलेल्या सभेत उद्धव ठाकरे कसे प्रत्युत्तर देणार याबाबतची उत्सुकता असणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य